सदाशिव साहित्य
आमचे बाबा, सदाशिव मोरेश्वर मोहरीर, यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सादर केलेली स्मरणिका आपण वाचलीच असेल. स्मरणिकेतल्या लेखांमधे बाबांच्या साहित्यसंपदेचा बरेचदा उल्लेख आला आहे. 'अमृत कलश' हा त्यांचा भक्तिगीतांचा संग्रह, 'मज्जीवनमणिमाला' हे त्यांचे आत्मचरित्र आणि 'अध्यक्ष महाराज' हा त्यांच्या शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसाठी १९३५-१९७५ ह्या कालखंडात निबंध, वक्तृत्व, वादविवाद आदि शालेय स्पर्धांसाठी केलेल्या लिखाणाचे संकलन. हे सर्व पुन्हा उपलब्ध करून देणे हाही जन्मशताब्दी संकल्प होता. त्याला आज मूर्त स्वरूप यावयास सुरुवात होते आहे. संकल्पसिद्धीला अाणखी काही वेळ लागेल, पण बाबांचे ग्रंथ थोड्याफार प्रमाणात आजपासून उपलब्ध होत आहेत. हळूहळू सर्व लिंक्स अॅक्टिव्हेट होतील. त्यामुळे ब्लाॅगला भेट देत रहावे. प्रत्येक ग्रंथाच्या प्रत्येक भागाला वेगळी लिंक दिलेली आहे.
प्रत्येक ग्रंथ पुन्हा टंकलिखित करावा लागला. त्याकरिता सर्वांचाच हातभार लागला. पण प्रमुख कलाकार खालीलप्रमाणे:
अमृतकलश: वृंदा आमोद देव
मज्जीवनमणिमाला: सुधीर सदाशिव मोहरीर, कविता सुधीर मोहरीर, सुचित्रा अभिजीत मोहरीर, वृंदा आमोद देव
अध्यक्ष महाराज: मृदुला मुकुंद पाटखेडकर, अमोल मुकुंद पाटखेडकर, विशाल मुकुंद पाटखेडकर, सुधीर सदाशिव मोहरीर, वृंदा आमोद देव
तुमचे अभिप्राय जसे जसे येतील तसे तसे 'प्रतिसाद' लिंकवर संकलित करायचा विचार आहे. अभिप्रायाची विनम्र अपेक्षा आहे.
येथूनच जन्मशताब्दी स्मरणिकेला, तसेच माझा तिसरा कवितासंग्रह 'बालवेद'ला जाण्याकरिताही लिंक दिलेली आहे.
धन्यवाद!
अरुण सदाशिव मोहरीर
arun.moharir@gmail.com
२२-१०-२०१५
विजयादशमी
अमृतकलश
प्रकाशकाचे मनोगत, कवीचे मनोगत, अर्पण पत्रिका, प्रस्तावना
भक्तिगीत क्र. १-१०
भक्तिगीत क्र. ११-२०
भक्तिगीत क्र. २१-३०
मज्जीवनमणिमाला
अर्पण पत्रिका, प्रकाशकाचे मनोगत, लेखकाचे मनोगत, प्रस्तावना, प्राक्कथन, श्रीगणेश महिमा
मणी १-३
मणी ४-६
मणी ७-९
मणी १०-१३
अध्यक्ष महाराज
अर्पण पत्रिका, प्रकाशकाचे मनोगत, लेखकाचे मनोगत, गुरुदक्षिणा
खंड १ : माझा देश
खंड २ : आमची संस्कृति
खंड ३ : वादरण
खंड ४ : द्वंद्व
खंड ५ : संवाद
खंड ६ : गोपालकाला
प्रतिसाद
स्मरणिका
बालवेद
No comments:
Post a Comment