प्रतिसाद
बाबांची ही तिन्ही पुस्तके दीड वर्षांच्या कालावधीत, विसाव्या शतकाच्या अखेर अखेर प्रसिद्ध झाली. बाबांची तशी अपेक्षा नव्हती, पण तसे घडले याचा त्यांना मनापासून आनंद होता. तो आनंद त्यांना देता आला याचा आम्हा सर्वांना आनंद होता.
जन्मशताब्दी स्मरणिकेत त्यांची ज्येष्ठ कन्या संगीता पाटखेडकर हिने बाबांचे समग्र साहित्य internet च्या सहाय्याने सर्वांना उपलब्ध करता येईल असे सुचविले. ती ठिणगी पुरे होती. 'सदाशिव साहित्य' तिच्याच कल्पनेवर झालेला अंमल आहे.
वाचकांचा प्रतिसाद जसाजसा येईल तसातसा आणि तसाच्या तसा येथे संकलित करण्याचा विचार आहे.
_____________________
Blog वर ती. बाबांच्या कविता पाहतांना डोळे भरुन आले. बाबा असतांना त्यांची तिन्ही पुस्तके प्रकाशित झालेली त्यांनी पाहिली होती, याचा आनंद तर आहेच. आपले लिखाण internet द्वारा Blog वर येईल असे त्यांना कल्पनेतसुध्दा कधीही वाटण्याची शक्यता नव्हती. मनःपूर्वक केलेले काम त्या आत्म्यापर्यंत पोहोचते असे म्हणतात. बाबांना निश्चितच आनंद झाला असणार. या कार्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन.
संगीता पाटखेडकर
२२-१०-२०१५
...........
संयोजक, संपादक, प्रकाशक, मुद्रणदोष निवारक, लेखक, उत्साहवर्धक, पद्यक, मार्गदर्शक अरुणच्या अष्टपैलू, अष्टांग व्यक्तिमत्वास नमनाष्टक!
सौ. वृंदा आमोद देव
२२-१०-२०१५
...........
स्वप्न साकारले!
पूर्वजांची पुण्याई फळां आली
वंशजांनीही साथ दिली
राहिल कसे उणे?
स्वप्न सत्याचे रूप ल्याले
अजिचा दिनु सौभाग्याचा
मौक्तिक आनंदाचा
स्वप्न साकारले
डोळां आनंदाश्रू तरारले
स्वप्न वास्तवाचे रूप ल्याले
विजया पारखी
२२-१०-२०१५
...........
अनुक्रमणिकेकडे
आज ऑफिसमध्ये गेलो नाही पण ह्या पूर्ण website चा मागोवा घेतला व त्यामुळे दिवस सत्कारणी लागला. हे विस्तृत संकलन केल्याबद्दल श्री अरुण मोहरीर यांचे अभिनंदन. आपल्या वडिलांची मी महालात १९६० ते १९७७ ह्या काळात राहून ही कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही पण त्यांच्या विषयी ऐकून माहिती होती. आठवी ते अकरावी वृंदा माझ्या वर्गात होती. व तिच्या ज्ञानातून त्यांच्या विषयी कल्पना येत होती. तरीही या प्रकल्पातून त्यांचे जे दर्शन झाले त्यामुळे समाधान वाटले. अशी माणसे आणखी पुढे गेली असती तर देशाला फार फायदा झाला असता. अर्थात शिक्षक पेशातूनही त्यांनी खूप कार्य केले. इतके विचारमंथन जे एक लेखकच करू शकतो तेही त्यांनी केले. त्यांच्या आठवणी वाचकांना मार्गदर्शन करीत राहोत ही सदिच्छा.
ReplyDeleteहेमंत घायाळ
हैदराबाद